चाळीसगावातील कष्टकरी महिलेला ‘बाप्पा’ पावले ; लकी ड्रॉ मध्ये जिंकली इलेक्ट्रिक स्कूटर

आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगावच्या एकदंत सांस्कृतिक महोत्सवात अखेरच्या दिवशी बक्षिसांची लयलूट ः हजारो भाविकांनी घेतला चाळीसगावच्या एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ


Chalisgaon’s hardworking woman was ‘Bappa’ ; Electric scooter won in lucky draw चाळीसगाव : गणेशोत्सव निमित्ताने चाळीसगाव शहरासह तालुकावासीयांना 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणार्‍या आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत या भव्य सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य, गायन, कीर्तन, अध्यात्म, प्रबोधन, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. . आबालवृद्धांसह विशेषतः महिला भाविकांनी या महोत्सवाला भेट दिली. आपला दररोजचा संसार – प्रपंच सांभाळून स्वतःसाठी वेळ काढणार्‍या या महिला भाविकांसाठी जवळपास 100 बक्षिसांचा लकी ड्रॉ आमदार मंगेश चव्हाण यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यात जवळपास 10 हजार महिलांनी आपली नोंदणी केली होती.

इलेक्ट्रीक स्कूटरच्या मानकरी ठरल्या चाळीसगावातील वयोवृद्धा
गुरुवारी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्यात सर्वात मोठे व पहिल्या क्रमांकाचे बक्षीस असणारी इलेक्ट्रिक स्कूटर या बक्षिसाच्या मानकरी चाळीसगाव शहरात अफू गल्लीतील 70 वर्षीय मथुराबाई जगन्नाथ गायके या ठरल्या. विशेष म्हणजे मथुराबाई यांच्या अगोदर दोन महिलांच्या नावाची चिट्ठी काढण्यात आली मात्र त्या लकी ड्रॉ साठी उपस्थित नसल्याने नियमाप्रमाणे पुढील चिठ्ठी काढली असता त्यात मथुराबाई यांचे नाव निघाले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लकी ड्रॉ चा खेळ सुरू होता. अत्यंत गरीबीची परीस्थिती असणार्‍या मथुराबाई गायके यांच्या पायात चप्पलदेखील त्यावेळी नव्हती. भाजीपाला विक्री करून त्या आपला उदरनिर्वाह चालवितात, त्यांचा एक नातू एका खाजगी फर्म तर एक नातू नंदन डेअरीवर कामाला आहेत. खर्‍या अर्थाने त्या कष्टकरी आजीला गणपती पावला अशीच भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

आजींचा उत्साह तरुणांना लाजवणारा
आमदार मंगेशदादा चव्हाण, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याहस्ते मथुराबाई गायके यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्यात आली. 70 वर्ष वय असले तरी तरुणांना लाजवेल असा उत्साह मथुरा आजी यांचा होता. माझी तब्बेत अजूनही चांगली आहे, मला या गाडीचा उपयोग नाही, आयुष्यभर मी पायी चालून कष्ट घेत संसार केला तस यापुढेही मी पायीच चालेल… गाडीची चार्जिंग संपेल पण माझ्या पायांची नाही असे आजीनी म्हणताच उपस्थितांनी जोरात टाळ्या वाजवत आजीला दाद दिली.

लकी ड्रॉ मध्ये असणारी 100 बक्षिसे .
आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवात छोटी मोठी जवळपास 100 बक्षिसे देण्यात आली. त्यात 1 इलेक्ट्रिक स्कूटर, 5 हिरो सायकल्स, 1 एलइडी टीव्ही, 5 मिक्सर, 2 गॅस शेगडी, 11 पोळी डबे, 10 भिंतीवरील घड्याळे, 10 कुकर, 15 कपबशी सेट, 30 पर्स अश्या बक्षिसांचा समावेश होता. शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही बक्षिसे देण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !