विधानसभा उमेदवारी कापण्याच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी मांडली ‘या’ शब्दात आपली भूमिका


Pankaja Munde’s stance on the question of cutting off candidature in the Legislative Assembly was presented in the word ‘Ya’ मुंबई : भाजपाच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात येईल, अशी चर्चा असताना त्यांनाच याबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. पंकजा मुंडे म्हणाल्या, 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही माझ्यासारख्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट न देणे हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही, त्यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

नवीन मतदारसंघ शोधणार नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या, आपण नवीन मतदारसंघ शोधत नाही. खासदार प्रीतम मुंडे यांचीही जागाही मी घेणार नाही. 2019 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा मंत्री धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि भाजप एकत्र सत्तेत आहेत, हे दोन्ही गट एकत्र निवडणुका लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा कारखानाही अडचणीत आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रीया दिली. मुंडे म्हणाल्या, सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाली आहे. ही नोटीस दोन-तीन महिन्यांपूर्वीही आली होती. दरम्यान, याबाबतचे वृत्त एका मराठी पोर्टलने ऑनलाईन दिले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !