नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गुरांची वाहतूक रोखत 53 गुरांची सुटका
Major action of Nashirabad Police : 53 cattle were rescued by stopping the traffic of illegal cattle नशिराबाद : अवैधरीत्या गुरांची वाहतूक होत असताना नशिराबाद पोलिसांनी वाहन अडवत तब्बल 53 म्हशींची सुटका केली तर तिघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 36 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नशिराबाद टोल नाक्यावर संशयित आयशर वाहन (एम.एच.18 बी.झेड.2444) आल्यानंतर त्यात प्रत्येकी 18, 18, व 17 अशा एकूण 53 म्हशी आढळून आल्या. पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कुठलेही प्रमाणपत्र न घेता तसेच प्राण्यांना त्रास होईल अशा पद्धतीने दाटीवाटीने गुरे कोंबून नेली जात असल्याने नशिराबाद पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.\ संशयित आरोपी सायब खान कलीम खान (28), साहिद खान सलीम खान (35, दोन्ही रा.खरगोन, मध्यप्रदेश) आणि चालक समीर शहा देवास शाह (29, रा.देवास जि. इंदोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.


