ओझरखेडा येथून सहा हजारांच्या कचराकुंड्या लांबवल्या
Six thousand dustbins were extended from Ozarkheda
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीच्या कचराकुंड्या लांबवल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओझरखेडा ग्रामसेवक राहुल अरुण चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, गावातील मरीमाता मंदिर ते बोहर्डी रस्त्यादरम्यान ग्रामपंचायत मालकिच्या सहा हजार रुपये किंमतीच्या चार फूट लांबीच्या सहा कचराकुंड्या अज्ञात चोरट्यांनी 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. तपास हवालदार प्रमोद कंखरे करीत आहेत.


