सोशल मिडीयावर टाकला तेढ निर्माण करणारा मजकूर ; बोदवड पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
Posting controversial content on social media; Bodwad Police handcuffed the youth बोदवड : बोदवड तालुक्यातील वराड येथील तरुणाने सोशल मिडीयावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धत्तीने मजकूर पोस्ट केल्यानंतर बोदवड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तरुणाला अटक केली आहे. हमीद हुसेन मुलतानी वंजारी (20, वराड, ता.बोदवड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तेढ निर्माण करणार्या मजकूर टाकताच पडल्या बेड्या
आरोपी हमीद याने वराड येथील सोशल मिडीया ग्रुपवर महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह भाषेत लिखाण केले तसेच चिन्ह टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार 30 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घडला. याप्रकरणी नाईक शशिकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संतोष जगन्नाथ चौधरी करीत आहेत.


