महात्मा गांधी छात्रालयात स्व.स्वप्निल ललवाणी स्मृती दिनानिमित्त आदरांजली
Tribute to Swapnil Lalvani Memorial Day at Mahatma Gandhi Hostel भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे गावातील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित महात्मा गांधी छात्रालयात राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक राजेंद्र गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांचे सुपुत्र स्वर्गीय स्वप्निल ललवाणी यांन तृतीय स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
ललवाणी परीवार हा सेवाभावी परीवार
एकनाथ बडगुजर यांनी संस्था संचलित छात्रालय हे भविष्य घडवणारे केंद्र असून विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करावे, शिकावे व छात्रालयाचे व गावाचे नाव उंचवण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक राजेंद्र गवळी यांनी प्रास्ताविकात छात्रालय व विद्यालयाबद्दल माहिती दिली. ललवाणी परीवार हा सेवाभावी परीवार असून नेहमीच दात्रृत्वासाठी तयार असतो. त्यांनी आतापर्यंत विविध माध्यमाद्वारे समाजसेवा केली असल्याचे गवळी म्हणाले. सेवेची संधी दिल्याबद्दल डी.एम.ललवाणी
यांनी संस्थेचे, विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे आभार मानले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
ललवाणी परीवाराचे अर्ध्वयू मदनलाल ललवाणी, प्रा.डॉ.दिलीप ललवाणी, शोभा ललवाणी, नलीन ललवाणी, मानस ललवाणी, इन्कम टॅक्स व ऑडिट प्रॅक्टिशनर प्रशांत कोटेचा, समाजसेवक कमलेश निकुंभ, भरत कोळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक पुरुषोत्तम बडगुजर, सहकारी मुकेश बरकले, विकास टोंगळे, सुमनबाई वाघ, रेखा सुरळकर यांनी परीश्रम घेतले.
