जय गणेश फाऊंडेशनचा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला

बक्षीस वितरणप्रसंगी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे


Deputy Superintendent of Police Krishnat Pingle on the occasion of prize distribution भुसावळ : पारतंत्र्यात असतांना समाजाने कोणत्या-ना-कोणत्या कारणाने एकत्र यावे आणि त्यातून लोकांसाठी चांगले विचार, चळवळ उभी राहावी या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. विविध स्पर्धा, व्याख्याने आयोजित करून गणेश फाऊंडेशन त्याचे तंतोतंत पालन करीत असल्याचे गौरवोद्गार भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी बक्षीस वितरण समारंभात काढले. अशाच स्पर्धा व वैचारीक व्याख्यानांचे आयोजन झाल्यास त्यातून एखादा चांगला कलाकार, साहित्यिक, खेळाडू तयार होत असतो, त्यामुळे बक्षिसाच्या मागे न लागता सहभाग महत्त्वाचा असल्याचा सल्लाही त्यांनी स्पर्धकांना दिला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी जय गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेंडकुळी, समन्वयक गणेश फेगडे हे होते. यावेळी विविधस्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

विविध स्पर्धा व विजेते पुढीलप्रमाणे
सोलो डान्स (लहान गट)- नुपूर भालेराव (प्रथम), मनुदेवी राजपूत (द्वितीय), सोलो डान्स (मोठा- रागिणी जोनवाल (प्रथम), पियुष धुमाळ (द्वितीय),  गृप डान्स(लहान गट)- लिटील प्रिन्सेस (प्रथम), एचडीसी (द्वितीय), ग्रुप डान्स (मोठा गट)- अष्टमी ग्रुप (प्रथम), आईस ब्रेकर्स (द्वितीय), रंगभरण स्पर्धा (लहान गट)- गिरीजा सावदेकर (प्रथम), स्वरूप जोशी (द्वितीय), रंगभरण स्पर्धा (मोठा गट), ज्ञानेश्वरी सनांसे (प्रथम), डिंपल काकडे (द्वितीय),, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (लहान गट)- गिरीजा सावदेकर (प्रथम), तेजस खाचणे, हस्ताक्षर मोठा गट- राखी महाजन (प्रथम), रुद्राणी गजेश्वर (द्वितीय).

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रा.ए.व्ही.चौधरी, तुकाराम आटाळे, सुमित यावलकर, तुषार झांबरे, राहुल भावसेकर, राजेंद्र कोलते, रवी जोनवाल, प्रवीण पाटील, रवी पाटील, प्रभाकर चौधरी, अभिषेक वाणी, रीतेश बेंडाळे, पियुष शर्मा, यश अग्रवाल, ईशांत चौरसिया, विशाल आहुजा, सुमित आहुजा आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे तर आभार युथ क्लबचे अध्यक्ष नचिकेत यावलकर यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !