भरधाव बस व दुचाकीत अपघात : मोरव्हालच्या प्रौढाचा मृत्यू
Rushing bus and two-wheeler accident: Death of an adult from Morval रावेर : भरधाव बस व दुचाकीमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात मोरव्हालच्या प्रौढाचा मृत्यू झाला तर सोबतचे दोघे जखमी झाले. हा अपघात पाल-मोरव्हाल रस्त्यावर बुधवारी सकाळी घडला.
पालहून रावेरकडे भरधाव वेगाने निघालेली बसची दुचाकीला धडक बसल्यानंतर दुचाकीवरील तिघे अपघातानंतर रस्त्यावर जोरदार आदळले. या अपघातात विठ्ठल रामसिंग भील (50, रा.मोरव्हाल, जि.खरगोन) हा जागीच ठार झाला तर बबलू ऐसिंग भील (30), सुनील सुभाष भील (25) हे दोघे गंभीर जखमी. त्यांच्यावर फैजपूर येथील रुग्णालयात उपचार सरू आहे.


अपघातस्थळी पाल चौकीचे पोलिस नाईक विष्णू भिल, प्रदीप सपकाळे, मुकेश मेढे यांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
