यावलकरांना मोठा दिलासा : वाढीव पाणीपट्टी रद्द

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


Big relief for Yavalkars : Increased water tariff cancelled यावल : यावल शहरातील विस्तारीत कॉलनी भागातील रहिवाशांना वाढीव पाणीपट्टीची बिले देण्यात आली होती मात्र यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या संदर्भात तक्रार व पाठपुराव केल्यानंतर नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीपुरवठा न झाल्याची माजी नगराध्यक्षांची तक्रार
पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून व्हावा म्हणून तडवी कॉलनी भागात 10 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला. पाणी वितरणासाठी पाईप लाईन सुद्धा टाकण्यात आली. पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्या भागातील नागरीकांनी अधिकृत रक्कम भरणा करून व आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा करून नळ जोडणी केली मात्र मार्च 2022 पर्यंत पाईप लाईनद्वारे नवीन नळ धारकांना पाणी पुरवठा झाला नव्हता. अशा 328 नळधारकांना पाणीपट्टी शुल्क आकारू नये, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी 17 मार्च 2022 रोजी पत्र देऊन केली होती व ती मागणी मंजूरदेखील करण्यात आली होती. त्याप्रमाणे मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता पालिकेने दिलासा दिला होता पण यंदा 2023-24मध्ये पालिकेने पाठविलेल्या पाणीपट्टी बिलात मागील वर्षाची थकबाकी 1500 रुपये + व्याज 120 रुपये व चालू वर्षाचे 1500 रुपये असे एकूण तीन हजार 120 रुपये पाणीपट्टी आकारली होती. नागरीकांना पाठविण्यात आलेल पाणीपट्टी शुल्क बेकायदेशीर असून नवीन नळ धारकांवर अन्याय करणारी असल्याने ती रद्द करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचा ईशारा अतुल पाटील यांनी दिला होता.


पाठपुराव्याला यश : अखेर पालिकेने दिले पत्र
अतुल पाटील यांच्या मागणीनुसार पालिकेने दखल घेऊन थकबाकी सदराखाली देण्यात आलेली रक्कम एक हजार 620 रुपये कमी करण्यात आली असुन तसे पत्र पाटील यांना देण्यात आले. पत्रामध्ये विस्तारीत भागातील नवीन 328 नळ धारकांना सन 2021-2022 चे पाणीपट्टी शुल्क माफ करणेबाबत प्रशासकांनी मंजुरी देऊन मायनेट् प्रणाली सिस्टीममध्ये समायोजित करून माफ केले होते परंतु शासनाकडून नवीन प्रणाली महा यूएलबी सिस्टीममध्ये माफ केलेले परीणाम दिसून न आल्याने 328 नळ धारकांना मागील पाणीपट्टी व व्याज 1620 रुपये तसेच 2023-24 ची पाणीपट्टी 1500 रुपये असे एकूण तीन हजार 120 रुपयांचा बिल पाठविण्यात आले. या संदर्भात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आवाज उठवल्यानंतर मागील थकबाकी सदराखाली देण्यात आलेले 1620 रुपये नवीन प्रणाली महायूएलबी सिस्टीममधून कमी करण्यात आली. केवळ 2023-2024 या चालू वर्षाची पाणीपट्टी 1500 रुपये भरावी, असे पालिकेने म्हटले असून त्याबाबतचे पत्र अतुल पाटील यांना देण्यात आले आहे.

नागरीकांना न्याय देता आल्याचे समाधान
यावल पालिकेने मायनेट प्रणाली ऐवजी महायूएलबी प्रणाली सिस्टीममध्ये नळ धारकांचा समावेश केल्याने तांत्रिक चुकीमुळे पाठविण्यात आलेली थकबाकी रक्कम रद्द करण्यात आली आहे. सजग नागरीकांमुळे हा प्रश्न प्रशासनासमोर मांडता आला व त्याला यश मिळाले. विस्तारीत भागातील 328 नळ धारक यांचे प्रत्येकी 1600 रुपये रक्कम वाचवता आली म्हणून समाधानी असल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !