डॉक्टर महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार


Rape of doctor woman by luring her for marriage नाशिक : डॉक्टर महिलेवर लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार करण्यात आला त्यातून पीडीता गर्भवती राहिली मात्र संशयिताने तिचा गर्भपात करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित डॉक्टर महिलेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा तथा संशयित संदीप भगवान दोंदे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मिडीयातून झाली ओळख
डॉक्टर महिला व संशयित संदीप यांची जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् प्रेमात झाले. त्यानंतर संशयित हा पिडितेला भेटण्यासाठी भेटण्यासाठी तिच्या घरी आल्यानंतर त्याने महिला डॉक्टरांना लग्नाचे आश्वासन देत संबंध ठेवले, पीडीतेने विरोध केल्यानंतर आपण लग्न करणार आहोत, असा विश्वास दिला. ऑगस्ट महिन्यात पिडितीला गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने याबाबत संशयिताला कल्पना दिली असता त्याने ‘सध्या आपल्याला बाळ ठेवता येणार नाही…’ असे सांगून गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भपात केला.



विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल
त्यानंतर पुन्हा असाच प्रकार संशयिताने शरिरसंबंध केल्याने घडला अन् पिडिता चार महिन्यांची दुसर्‍यांदा गर्भवती झाल्याचे ऑक्टोबरमध्ये लक्षात आले. यानंतर तिने पुन्हा संशयितास सांगितले असता, त्याने ‘तुझ्याशी माझा काही संबंध नाही, मी तुला लग्नाचे आश्वासन दिलेले नाही सांगून तुझे परिसरात राहणे अवघड करू अशाप्रकारे दम भरला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित संदीपविरूद्ध बलात्कारासह गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक मनीषा शिंदे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !