कंत्राटी भरतीत जनतेची दिशाभूल : वरणगावात भाजपाचे आंदोलन


Misleading the public in contract recruitment : BJP agitation in Varangaon वरणगाव : कंत्राट भरती पद्धत सुरू करून जनतेचा व तरुणांचा विश्वासघात करणार्‍या महाविकास आघाडी सरकारविरोधात वरणगाव भारतीय जनता पार्टी च्या वतीने तिरंगा सर्कल येथे निषेध करण्यात आला व माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे, खासदार शरद पवार व नाना पटोले यांनी राज्यातील तरुणांची व जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करून महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. कंत्राट भरती कायदा रद्द करून राज्यातल्या जनतेला दिलासा दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख शे.यूसफ, शहराध्यक्ष सुनील माळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणिता पाटील, नगरसेविका माला मेढे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष गोलू राणे, शामराव धनगर, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादीक शेख, बळीराम सोनवणे, किरण वंजारी, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, शहराध्यक्ष डी.के.खाटीक, ज्येष्ठ नेे हाजी अल्लाद्दीन सेट हाजी, फहिम शेख, मुस्लिम भाई अन्सारी, रमेश मामा पालवे, संतोष पाटील, छोटू सेवांतकर, गंभीर माळी, फजलभाई शेख, नाना चौधरी, उत्तम पहेलवान भोई , राजेंद्र चौधरी, हितेश चौधरी, संतोष कश्यप, शालिग्राम डोयसे, चेतन चौधरी, राहुल जंजाळे, रमेश कोळी, नारायण कोळी, विश्वनाथ धनगर, देविदास धनगर, विनायक कोळी, नूरू शेख शकील, प्रवीण असोलकर यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !