धुळ्याहून मुंबईसाठी स्वतंत्र एक्स्प्रेसचा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी केला शुभारंभ

0

Independent Express from Dhule to Mumbai was inaugurated by MP Dr. Subhash Bhamre भुसावळ : धुळे व चाळीसगाव परीसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला सोमवार, 13 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी धुळे स्थानकावर सकाळी 06.30 वाजता या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धिरेंद्र सिंग आणि धुळे येथील प्रवाशी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
डाऊन 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे दैनिक एक्सप्रेस दररोज दुपारी 12 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामदा, शिरूड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

अप 11012 धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दररोज पहाटे 6.30 वाजता सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी दुपारी 2.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला 16 डब्बे असतील. त्यात एक वातानुकूलित चेअर कार, 13 साधारण (नॉन एसी), चेअर कार (पाच आरक्षित आणि 8 अनारक्षित), एक साधारण द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.


कॉपी करू नका.