ट्रक-कारच्या भीषण अपघातात महिलेसह दोघे ठार
Two killed, including the truck-car horror woman पुणे : बाराचाकी ट्रक व कारच्या भीषण अपघातात महिलेसह दोघे ठार झाले. हा अपघात चीव्हेवाडी जवळील देवडी येथे घडला. अपघातात महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे (28, रा.किकवी, ता.भोर) आणि तृप्ती अक्षय जगताप (26, रा.सुपे खुर्द, ता.पुरंदर) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर (रा. धावडी, ता.भोर) हे जखमी आहेत.
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मयत गणेश शिवाजी लेकावळे हे हडपसर येथील एका कंपनीत कामाला असून नेहमीप्रमाणे ते त्यांची वॅगणार कार क्रमांक (एम.एच. 14 डी.टी. 9587म) मधून सकाळी लवकर कामाला निघाले होते. तसेच मयत तृप्ती अक्षय जगताप त्यांच्या माहेरी किकवी येथे गेल्या होत्या. मयत लेकावळे यांच्या शेजारीच त्यांचे माहेर असून त्यांच्याच गाडीत बसून सासवडकडे निघाले होते. दरम्यान सकाळी 8.30 च्या दरम्यान वॅगन आर कार पुरंदर तालुक्यातील देवडी गावच्या हद्दीतील पहिल्या वळणावर असताना समोरून येणार्या एम.एच.15 डी.के.4247 या अशोक लेलंड कंपनीच्या 12 चाकी ट्रकवरील चालकाने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने चालक गणेश शिवाजी लेकावळे यांच्या सह शेजारील सीट वरील बसलेल्या तृप्ती अक्षय जगताप यांना जोरदार मार लागून जागीच मृत्यू झाला. याबाबत रोहिदास पांडुरंग लेकावळे यांनी सासवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालक पसार आहे.


