नाशिकमध्ये भाच्याने मामाला संपवले ; कारण वाचून बसेल धक्का
In Nashik, nephew kills uncle ; Because you will be shocked to read it नाशिक : किरकोळ वादातून भाच्याने मामाचा खून केल्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत बाबूलाल सोमा गावीत (74, रा.मूळ पिंपळनेर, ता.साक्री) या मामाचा मृत्यू ओढवला तर संशयित मच्छिंद्र सुखदेव मानभाव (27, रा.कोळीवाडा, हिरावाडी) या भाच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
राग मनात ठेवून केली हत्या
हिरावाडी भागातील कोळीवाडा येथे आंबेडकर आवास योजनेत मागील दोन महिन्यांपासून शीला सुखदेव मानभाव यांच्या घरी बाबुलाल गावीत हे वास्तव्यास होते. संशयित मच्छिंद्र याचा मुलाच्या पायाला चटका बसल्याने दुखापत झाल्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन जायला पैसे नाहीत मात्र दारू प्यायला पैसे आहेत, असे बाबुलाल यांनी सांगितले व याचा राग मच्छिंद्रच्या डोक्यात असल्याने त्याने संतापात मामा बाबुलाल यांना उचलून जमिनीवर आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला. इंदुबाई सुखदेव खाने (67, रा.पिंपळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


