संशयाचे भूत मानगुटीवर बसताच सासरा दोन मेहुण्यांसह पत्नीला संपवले
As soon as the ghost of doubt settled on Manguti, the father-in-law killed his wife along with two brothers-in-law यवतमाळ : पत्नीचे बाहेर अफेयर सुरू असल्याचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले मात्र त्यातून सातत्याने टोकाचे भांडण होत असल्याने पत्नी पतीला सोडून माहेरी आली. त्यानंतर पतीच्या डोक्यातील राग कमी झाला नाही तर सासरवाडीला येत त्याने आधी पत्नीला संपवले नंतर सासर्यासह दोन शालकांची हत्या केली तर सासुवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला मात्र त्यात ती बचावली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री ही घटना घडली.
सपासप वार करीत केली हत्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने संतप्त जावयाने शस्त्रान आधी पत्नी व नंतर शालक सासर्याचा निर्घृण खून केला. या घटनेत एकाच कुटुंबतील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी झाली. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसाळे, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले यांचा मृत्यू झाला आहे.


सततच्या वादामुळे पत्नी आली माहेरी
कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे पती – पत्नी राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याचे वृत्त आहे. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंद याला होता. त्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला नेहमी मारहाण करत होता त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहायला आली होती. यामुळे गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते. या वादातूनच हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सासू हल्ल्यात गंभीर जखमी
दरम्यान, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. संतापलेल्या जावयाने शस्त्राच्या सहाय्याने पत्नी रेखा, सासरा पंडित, सासू रूखमा व मेव्हणे ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. वार थेट छातीवर करण्यात झाल्यामुळे पत्नी रेखा पवार, सासरा पंडित घोसले, मेव्हणा ज्ञानेश्वर घोसले व सुनील घोसले हे जागीच ठार झाले तर सासू रूखमा घोसले ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
