भुसावळातील संशयित एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
आगामी काळात आणखी उपद्रवींवर होणार कारवाया : गुन्हेवारी वर्तुळात खळबळ
Bhusawla suspect deported from Jalgaon district for one year भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या उपद्रवींविरोधात बाजारपेठ पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे दाखल केल्यानंतर शेख सद्दाम शेख हसन उर्फ बबलू (भुसावळ) यास एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी नुकतेच काढले.
संशयिताला बर्हाणपूरात सोडले
शेख सद्दाम यास बाजारपेठ पोलिसांनी बर्हाणपूर येथे दो दिवसांपूर्वी सोडले असल्याचे बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले. शहरातील आणखी काही उपद्रवींवर हद्दपारी तसेच स्थानबद्धतेची कारवाई शक्य असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


