मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आज भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर


भुसावळ : मध्य रेल्वेचे नूतन महाव्यवस्थापक आर. के. यादव हे शुक्रवारी सकाळी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर येत असून जीएम दौर्‍यानिमित्त प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी सकाळी भुसावळ स्थानकाची आणि परीरसराची यादव हे पाहणी करतील.

विविध कामांची करणार पाहणी
नंतर सावदा, निंभोरा येथील पूल, वाघोड पूल, बर्‍हाणपूर स्टेशन, आशिरगड येथे निरीक्षण तसेच खंडवा रेल्वे स्थानकाची पाहणी ते करतील व पुन्हा सायंकाळी भुसावळात परततील. महाव्यवस्थापक यादव यांच्या भुसावळ डीआरएम असतांनाच्या काळात मोंठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली होती, आता तर संपूर्ण विभागात रेल्वेची विकास कामे सुरू आहे, याच कामांची पाहणी करण्यासाठी महाव्यवस्थापक यादव येथे येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !