भुसावळातील श्री साईचंद्र नगरात रस्ता डांबरीकरणाला सुरूवात

रहिवासी सुखावले : माजी नगरसेवक गिरीश महाजनांच्या पाठपुराव्याला यश


Road asphalting has started in Sri Saichandra Nagar in Bhusawal
भुसावळ :
शहरातील यावल रोडवरील श्री साईचंद्र नगरात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून सुमारे दिड वर्षांपूर्वी डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती मात्र ठेकेदार व पालिकेच्या वादात बीबीएम झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण रखडल्याने नागरीकांना मोठा त्रास सोसावा लागत होता मात्र भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून व समाजसेवक तथा माजी नगरसेवक गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून शुक्रवारपासून रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात असल्याने रहिवासी सुखावले आहेत. संपूर्ण कॉलनीतील रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरीकांनी यावेळी माजी नगरसेवक गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली.

रस्ता कामामुळे दिलासा
यावल रोडवरील श्री साईचंद्र नगरात सुमारे दिड वर्षांपूर्वी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली मात्र ठेकेदार व पालिकेच्या वादानंतर हा विषय खंडपीठात गेल्यानंतर रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला परीणामी पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना नागरीकांना करावा लागला. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला मात्र डांबरीकरण रखडले होते.



भाजपाचे माजी नगरसेवक गिरीश महाजन यांनी नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेता आमदार संजय सावकारे यांच्याकडे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची विनंती केल्याने विशेष रस्ता अनुदानातून पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून शुक्रवारपासून रस्त्यावर पुन्हा बीबीएम करण्यास सुरूवात झाली तर पंधरवड्यात कारपेट व सीलपेटची कामे केली जातील, असेही माजी नगरसेवक गिरीश महाजन यांनी सांगितले. उशिरा का होईना रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने रहिवासी सुखावले आहेत. दरम्यान, कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये उभारण्यात येत असलेल्या मंदिरासाठी हायमास्टची मागणी महाजन यांच्याकडे यावेळी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !