श्रीराम मंदिर सोहळ्यासाठी खंडोबा देवस्थानात दीपोत्सवाचे आयोजन

22 जानेवारीला सव्वालाख दीप प्रज्वलित होणार


Deepotsava organized at Khandoba Devasthanam for Shri Ram Mandir celebration फैजपूर : हिंदूस्थानसह संपूर्ण विश्वातील करोडो हिंदूच्या हदयात विराजमान असलेल्या श्री प्रभू रामचंद्र (रामलल्ला) यांचे जन्मस्थळ श्रीक्षेत्र अयोध्या नगरीत भव्यदिव्य अनोख्या राम मंदिरात श्रीराम लल्लाची विलोभनीय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा 22 रोजी होत आहे. हा दिवस देशातील प्रत्येक हिंदू बांधवांसाठी धार्मिक अध्यात्मिक उत्साह व जल्लोषाचा आहे. याचाच एक भाग म्हणून ऐतिहासीक धार्मिक फैजपूर नगरीतील प्राचिन जागृत श्री खंडोबा देवस्थान परीसरात सामूहिक दीपोत्सोव (सव्वा लक्ष दिप) आयोजनाचा भव्य संकल्प खंडोबा मंदिराचे गादीपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, उत्तराधिकारी पवनदासजी यांनी केला आहे.

दीपोत्सव सोहळ्यात सहभागाचे आवाहन
सोमवार, 22 जानेवारी रोजी दुपारी दोन वा.जता सुंदरकांड तर दीपोत्सव सोहळा दुपारी चार वाजता होणार आहे. दीपोत्सवात फैजपूर व पंचक्रोशितील भाविकांनी तन, मन, धनाने सहभागी होत सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष सतपंथरत्न महामंडलेश्वर श्री जर्नादन हरीजी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, उत्तराधिकारी पवनदासजी, पूजारी राममनोहर दासजी व आयोजन समितीने केले आहे या आनंददायी दीपोत्सवाचा प्रचार-प्रसार कार्य उत्तराधिकारी पवनदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल-रावेर तालुकाभरात जोमाने सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !