नवीन शैक्षणिक धोरणात आवडीचे विषय शिकण्याची संधी : प्रा.डॉ.एस.आर.चौधरी

भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जनजागृती परीसंवाद


The turn of learning subjects of interest in the new educational policy : Prof. Dr. S. R. Chowdhury भुसावळ : येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण पद्धतीत अनेक आमुलाग्र बदल होणार आहेत शिवाय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पातळीवर समकक्ष होणार असून विद्यार्थ्यांना अनेक त्यांच्या आवडीचे विषय शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार अभ्यासक्रम जास्त लवचिक होऊन तो कौशल्याधारीत होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यामुळे ही काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असा आशावाद कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विषयाचे डायरेक्टर प्रा.एस.आर.चौधरी यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात एक दिवसीय ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ जनजागृती परीसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक तसेच परीसंवादाचे समन्वयक प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते. विद्यापीठाने प्रायोजित केलेला हा परीसंवाद भोळे महाविद्यालय आणि के.नारखेडे महाविद्यालयातील बारावी, पदवी स्तराच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासाठी आयोजित करण्यात आला.



रोजगाराचा प्रश्न सुटणार
प्रा.डॉ.एस.आर.चौधरी पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करायची असल्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. पदवी घेऊन बाहेरच्या देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही त्यांची पदवी समकक्ष असल्यामुळे बाहेर देशातील विद्यापीठांमध्ये जुळवून घेताना अडचणी होणार नाहीत.

आवडीच्या विषयात घ्या शिक्षण
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घेणे सुलभ होणार असल्याचे सांगत प्रत्यक्ष कामाच्या अनुभवामुळे रोजगाराचा प्रश्न ही सुटेल, असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल आहेत ते विद्यार्थी हिताचे आहेत सर्वांना सारखा अभ्यासक्रम, सारखी पदवी मिळणार आहे. देशामध्ये, देशाबाहेर कुठे ही प्रवेश घेता येईल, असेही ते म्हणाले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय आणि के.नारखेडे महाविद्यालय येथील बारावीचे, पदवी स्तराचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही पालक तर ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तर प्रस्तावना प्रा.डॉ.जयश्री सरोदे तसेच आभार प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.दीपक जैस्वार, प्रा.धनश्री नेहते, प्रा.भावना चौधरी, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.आरती भोई, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे, सुनील ठोसर, दीपक महाजन, विजय पाटील आदींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !