फेकरीत आर्थिक वादातून हत्या : दुसर्‍या पसार संशयिताला अटक


Fake money dispute murder : Another Pasar suspect arrested भुसावळ : फेकरी, ता.भुसावळ येथील तरुणाची आर्थिक वादातून धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आली ही होती. ही घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात शनिवारी, 13 रोजी दुपारी घडली होती. या घटनेत भावेश अनिल भालेराव (25, भगवान साळवे नगर, फेकरी) या तरुणाचा मृत्यू ओढवला होता तर सुरूवातीला या खुनात मुख्य संशयित तथा बॉक्सर असलेल्या रोशन बबन हुसळे (28, फेकरी) या संशयिताला अटक करण्यात आली होती.

संशयितांना 20 पर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान, या खुनात अन्य संशयित असल्याची माहिती समोर आल्यानंतर भुसावळ तालुका पोलिसांनी संशयित आकाश महेश परदेशी (24, कंडारी, ता.भुसावळ) यास कंडारी गावातून अटक केली. संशयित आकाश व रोशन यांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.



आर्थिक वादातून केला खून
मयत भावेश भालेराव व रोशन हुसळे यांच्यात पैशांचा वाद होता व पैशांवरून भावेश सातत्याने रोशनकडे तगादा लावत असल्याने शनिवारी पुन्हा वाद उफाळताच बॉक्सर रोशनने साथीदार रोशनच्या मदतीने दगड व चाकूचे वार करीत भावेशची हत्या केली. संशयित रोशनला अटक केल्यानंतर या खुनात आकाश परदेशीचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यास सोमवारी अटक करण्यात आली. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !