लग्न न केल्याने पिळोद्यात पित्याची कुर्‍हाडीने हत्या ; आरोपी मुलाला तीन दिवसांची पोलिस कोठडी


Father killed with an ax in Piloda for not marrying ; Accused boy remanded to police custody for three days यावल : यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द या गावात लग्न करून देत नाही या कारणावरून मुलानेच आपल्या बापाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून त्यांची हत्या केली होती. रविवारी मध्यरात्री नंतर घडलेल्या या घटनेतील मुख्य आरोपी मुलास यावल न्यायालयाने गुरूवार, 18 जानेवारीपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

आरोपीला तीन दिवसांची कोठडी
पिळोदा खुर्द, ता.यावल या गावात रतन तानसिंग कोळी (63) या वृध्द इसमाची त्याचा मुलगा देवानंद रतन कोळी (28) याने रविवारी रात्री आपले लग्न का करून देत नाही या रागातून कुर्‍हाडीने वार करून हत्या केली होती. याप्रकरणी सोमवारी सुभाबाई कोळी यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीत देवानंद कोळी यास अटक करण्यात आली होती व मंगळवारी दुपारी संशयीत कोळी यास यावल न्यायालयात न्या.एस.बी.वाळके यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्यास गुरूवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, हवलदार सिकंदर तडवी, वासुदेव मराठे, अलाउद्दीन तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !