ट्यूबवेलच्या पाण्यावरून मारहाण : भुसावळच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल


Beating over tubewell water : A case has been registered against two people from Bhusawal भुसावळ : शेतातील सामायीक ट्यूबवेलच्या पाण्यावरून झालेल्या वादानंतर शेतकर्‍याला मारहाण करण्यात आल्याची घटना वांजोळा शिवारातील शेतात बुधवार, 17 रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
राजेंद्र यादव बावस्कर (52, जुना सातारा, कडू प्लॉट, भुसावळ) या शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार, वांजोळा शिवारात साकेगाव-वांजोळा रोडर शेत गट क्रमांक 57 मध्ये शेतकरी शेती पिकामांना सामायीक ट्यूबवेलवरून पाणी देत असताना आरोपींनी पिलरचे बुच कुणाला विचारून उघडले ? अशी विचारणा केली. यावेळी डोक्यावर काठीने मारहाण करण्यात आली तसेच मांडीवर लोखंडी फावडा मारून दुखापत करण्यात आली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !