दहिगावात दिड लाखांचा अवैध लाकूड साठा जप्त : एकाविरोधात गुन्हा दाखल
Illegal wood stock worth half a lakh seized in Dahigaon : A case has been registered against one
यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथे कोरपावली गावाकडील कच्च्या रस्त्यावर अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला लाकडाचा साठा वनविभागाच्या पथकाने जप्त केला आहे. तब्बल एक लाख 34 हजार 031 रुपये किंमतीचा हा लाकूड फाटा आहे. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दहिगाव, ता.यावल येथील कोरपावली कच्च्या रस्त्यावर फकीरा दगडू तडवी (रा.नायगाव) याने अवैधरीत्या जळाऊ लाकूड फाटा साठवण करून ठेवला होता. गुरूवारी गुप्त बातमीवरून यावल वन विभागाचे उपवनसरंक्षक जमीर शेख, सहायक वनसरंक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, सरला भोंगरे, अश्रफ तडवी, अक्षय रोकडे यांनी कारवाई केली. येथून इंजायली लाकूड साठा यात इमारती 93 नग 12.215 घनमीटर, पंचरास जळाऊ थप्पी 115.512 घन मीटर असा एकूण एक लाख 34 हजार 31 रुपये शासकीय किंमतीचा लाकूड फाटा जप्त करण्यात आला. याबाबत फकीरा तडवी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


