साळशिंगी येथे बंद गोठ्यातून पाच क्विंटल कापसाची चोरी


Theft of five quintals of cotton from a closed cowshed at Salshingi बोदवड : शहरातील रहिवासी व साळशिंगी येथील शेतमालक संदीप मधुकर वैष्णव यांच्या गट क्रमांक 320 मधील गोठ्यातून चोरट्यांनी पाच क्विंटल कापसाची चोरी केल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.

वाढत्या चोर्‍यांमुळे घबराट
शेतकर्‍याने शेतात गुरांचा गोठा बांधलेला आहे व या गुरांच्या गोठ्यात कापूस साठवून ठेवला आहे. 16 जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याच्या गेटला असलेले कुलूप व खोलीच्या दरवाजाचे कुलूप टॉमीसारख्या शस्त्राने तोडून गोठ्यात साठवलेला सुमारे पाच क्विंटल कापूस बैलगाडीवारे चोरून नेला. या घटनेत शेतकरी संदीप वैष्णव यांचे 35 हजारांचे नुकसान झाले. आधीच दुष्काळाची परीस्थिती आहे व यंदाला कापसाला भाव नसल्याने शेतकर्‍यांनी कापूस साठवून ठेवला असताना चोर्‍या वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.



भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा
भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा व गस्त वाढवावी, अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाकडून होत आहे. कापूस चोरीच्या घटना प्रत्येक शेतकर्‍यांसोबत घडत आहेत. चोरट्यांना पोलिसांनी कारवाई करावी व शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी संदीप वैष्णव बोदवड यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सचिन चौधरी करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !