सावदा शहरात दगडफेक : पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त : अज्ञाताविरोधात गुन्हा
Stone pelting in Savada city : Strict police presence: Crime against unknown सावदा : अयोध्येतील राममंदिरात होणार्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांकडून सुशोभीकरणाचे काम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केल्याचा प्रकार शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक आणि गांधी चौकात शनिवारी रात्री घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही मात्र अचानक घडलेल्या प्रकारानंतर मोठी धावपळ उडाली. जिल्हास्तरावरून मोठी कुमक शहरात तैनात करण्यात आली आहे. अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस यंत्रणा तळ ठोकून
पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, सावद्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ, निंभोरा पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरीक्षक हरीदास बोचरे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात परीस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट
जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी रात्री सावदा येथे भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला. सावदा येथे रात्रीच अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून शहरात कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला.
