सावद्यात मोकाट कुत्र्याने घेतला दोन वर्षीय बालिकेला चावा
A two-year-old girl was bitten by a stray dog सावदा : सावदा शहरातील ओम कॉलनी परिसरातील दोन वर्षीय बालिका आपल्या अंगणात खेळत असताना मोकाट असलेल्या कुत्र्यांनी तिला चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला जळगाव येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी शहरात सहा ते सात वेळा अशा घटना घडल्यानंतरही मोकाट कुत्र्यांबाबत कुठलीही कारवाई पालिकेकडून केली जात नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत.
पालिकेच्या भूमिकेविषयी संताप
सावदा शहरात मोकाट डुकरांसह कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. डुकरे संपूर्ण गावात फिरून आर्थिक तथा नागरीकांना शारीरीक नुकसान करीत आहे तसेच मोकाट कुत्र्यांकडूनही आबालवृद्धांना चावा घेतला जात असल्याने नागरीकांमध्ये पाल्यांविषयी भीती पसरली आहे. पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या कुत्रे व डुकरांचा कुठलाही बंदोबस्त करण्यात आलेला नाही. ओम कॉलनी परीसरातील दोन वर्षीय बालिकेला कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर नागरीक पुन्हा संतप्त झाले आहेत. नागरीकांचा रोष वाढत असून पालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत नागरीत आहेत.


