सव्वा लक्ष राम ज्योतींनी फैजपूर शहर झगमगले


फैजपूर : श्री क्षेत्र अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज व खंडोबा देवस्थानचे गादिपती श्री श्रीपुरुषोत्तम दास जी महाराज यांच्या कृपा आशीर्वाद प्रेरणेने ऐतीहासीक फैजपूर नगरीत सव्वा लक्ष श्रीराम ज्योतींचा दीपोत्सव संकल्पना साकारण्यात आला. श्रीराम लक्ष दीपोत्सवाचे प्रचार प्रसारासाठी खंडोबा देवस्थान उत्तराअधिकारी पवनदासजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीने यावर, रावेर तालुका विविध धार्मिक अध्यात्मिक संकल्पनेतून पिंजून काढला.

शोभायात्रांनी वेधले लक्ष
भक्ती फेरी मंदिर स्वच्छता अभियान राबवून संपर्क साधण्यात आला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला फैजपूर शहरातून शेकडो महिला पुरुषांनी शोभायात्रा तर तरुणांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन शहरात केले. दुपारी दोन ते पाच संगीतमय बजरंग सुंदर कांडचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राम जीवनावर जिवंत सजीव दृश्य साकारण्यात आली. यामध्ये राम भक्त हनुमान हे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. प्रास्ताविक पवन दाजी महाराजांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले. आमदार शिरीष चौधरी व सुपूत्र धनंजय चौधरी, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, निलेश राणे, मिलिंद वाघुळदे, जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी नगरसेवक केतन किरंगे, हेमराज चौधरी यासह सर्व राजकीय पक्ष्यांचे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. दीपोत्सवाचा अनोखा नजारा अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.



दीपोत्सवासाठी आले भुसावळातून 11 हजार दिवे
भुसावळातील रानातल्या महादेव मंदिर गेल्या पाच वर्षांपासून 11 हजार दिवे प्रज्वलीत करण्यात आल्यानंतर या दिव्यांचे काय करायचे हा प्रश्न होता मात्र संत-महंतांच्या मार्गदर्शनाने हे दिवे फैजपूरच्या खंडोबावाडी देवस्थानात पाठवण्यात आले व सोमवारी सव्वा लाख दिव्यांमध्ये भुसावळातील दिवेही प्रज्वलीत झाले. याकामी श्री गजानन केटरर्सचे संचालक विनोद पाटील व अतुल पाटील व नागरीकांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !