टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सचा डंका
37 धावपटूंचा सहभाग : चार श्रेणीत झाली स्पर्धा
Bhusawal runners in Tata Mumbai Marathon भुसावळ : तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर रविवारी उमटली. जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2024’ ही स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील तब्बल 57 हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. यात भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 37 धावपटूंनी देखील यशस्वी सहभाग नोंदविला व आपल्या असोसिएशनचे व भुसावळ शहराचे नाव अभिमानाने उंचावले.
चार श्रेणीत स्पर्धा
42 किमीची पूर्ण मॅरेथॉन, 21 किमीची अर्ध मॅरेथॉन, महिलांकरीता 10 किमीचा रन व सहा किमीचा ड्रीम रन या चार श्रेणींमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. अर्ध मॅरेथॉन वगळता इतर तीनही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोरून सुरू झाल्या. अर्ध मॅरेथॉन माहिमच्या रेती बंदर मैदानातून पाच वाजता सुरू झाली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्याचे विविध खात्यांचे मंत्री व पोलिस, प्रशासन व महसूल विभागातील वरीष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. या धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ध्वनीक्षेपकावर गाणीही वाजविण्यात आली. तसेच मुंबई पोलिस बॅण्डनेही सादरीकरण केले.


37 धावपटूंचा सहभाग
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनमधील 42 किमीमीटर गटात 14 धावपटू धावले. त्यात उमेश घुले, विजय फिरके, तरुण बीरिया, मोहन देशपांडे, युवराज सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, विलास पाटील, संतोष मोटवानी, सुरेश सहानी, प्रदीप सोळंकी, संदीपकुमार वर्मा, प्रवीण वारके, गणसिंग पाटील, डॉ.तुषार पाटील
21 व 10 किलोमीटर अंतरात 17 धावपटू धावले
21 किमी गटात 15 धावपटू धावले. त्यात डॉ.चारुलता पाटील, डॉ.स्वाती फालक, डॉ.वर्षा वाडिले, एकता भगत, दीपा स्वामी, माया पवार, प्रियंका मंत्री, महेंद्र पाटील, रमेशसिंग पाटील, सारंग चौधरी, सुधाकर सनांसे, प्रकाश आटवानी, सचिन मानवानी, जय मनवानी, प्रवीण पाटील, राजेंद्र घाटे तसेच दहा किलोमीटर गटात माधुरी चौधरी, किर्ती मोताळकर तसेच सहा किलोमीटर अंतरासाठी पूनम भंगाळे, वैशाली मानकरे, नितीन पाटील, संजय मोताळकर, भालचंद्र मानकरे धावले.