भुसावळ तालुक्यातील विकास कामांसाठी एक कोटींचा निधी मंजूर.

भुसावळ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती, गावांच्या विकासासाठी आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा करून सुचवलेल्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
या कामांना मिळाली मान्यता
मंजूर झालेल्या कामांमध्ये वराडसीम, काहूरखेडा, दर्यापूर व खडका येथील मागासवर्गीय वस्तीला जोडल्या जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रत्येकी गावाला 15 लाख असे एकूण 60 लाख, कुर्हा येथील मागासवर्गीय वस्तीत डांबरीकरण करणे 15 लाख, सुसरी येथे बेघर वस्तीमधील रस्ता डांबरीकरण 15 लाख, आचेगाव येथे मागासवर्गीय वस्तीत शौचालय बांधणे 10 लाख असा एकूण एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये राहणार्या नागरीकांना लवकरच चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
