मराठा समाजाला आरक्षण : मुक्ताईनगरात मराठा समाजबांधवांचा जल्लोष


Reservation for Maratha community : Maratha community members rejoice in Muktainagar मुक्ताईनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर शहरातील परीवर्तन चौकामध्ये महात्मा ज्योतिब फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष केला. मराठा सेवा संघ व मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी पाठिंबा व सहकार्य करणार्‍या समाज बांधवांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
सत्कारप्रसंगी युवा गुर्जर समाजाचे युवा नेते श्रीकांत पाटील, मुस्लिम समाजाचे अफसर खान, शकूर जमदार, सलीम खान, युनूस खान, शकील मेंबर, मुस्लिम मणियार बिरारीचे युवा नेते हकीम चौधरी, कोळी समाजाचे पंकज कोळी, भोई समाजाचे छोटू भोई, शहा समाजाचे जाफर आली, मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख ,मराठा सेवा संघाचे वस्तीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, साहेबराव पाटील, दिलीप श्रीराम पाटील. प्रफुल पाटील, दिलीप पाटील, नगरसेवक संतोष मराठे, गणेश घाईट ,गौरव दुपटे, पप्पू मराठे, सोपान मराठे, विनोद विठ्ठल पाटील (शेमळदे), घोडसगाव येथील गोलू मोहर, निलेश भगत, वैभव भगत (रुईखेडा), राजू तुकाराम भंगाळे, कृष्णा पाटील, चिखली सरपंच वैभव पाटील तसेच समाज बांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !