भुसावळात बिसारा लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ
भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बीसारा लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पन्नासहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून भुसावळ वाहतूक शाखेच्या प्रमुख सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण उपस्थित होत्या. प्रा.प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अपनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर आर.पी.डी.रोडवर उद्घाटन झाले. सुरुवातीस डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी रुपाली चव्हाण यांचे स्वागत केले. रुपाली चव्हाण म्हणाल्या की, या रनमध्ये सहभागी होण्याचे सलग तिसरे वर्ष आहे. रुपाली चव्हाण व या रनमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या चंपा जहांगीड यांच्याहस्ते नारळ वाढवून सराव सत्राचे उद्घाटन करण्यात आले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले. यावेळी डॉ.तुषार पाटील, गणसिंग पाटील, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके, रणजीत खरारे यांची उपस्थिती होती.
3 मार्च रोजी लेडीज रन
लेडीज रन 3 मार्च रोजी होत असून तीन किमी, पाच किमी व 10 किमी या तीन श्रेणींमध्ये होत आहे. नाव नोंदणी सुरू असून त्यासाठी जामनेर रोडवरील नेहेते हॉस्पिटल येथे डॉ.नीलिमा नेहेते (9325638717) किंवा पंचमुखी हनुमान मंदिराजवळील सुप्रभा हॉस्पिटल येथे डॉ.चारुलता पाटील (9823799758) यांच्याशी संपर्क साधता येईल. ऑनलाईन पद्धतीने देखील टाऊनस्क्रिप्ट या संकेत स्थळावर नावनोंदणी शक्य आहे. त्यासाठी प्रवीण पाटील (9422772178) यांच्याशी संपर्क साधण्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.








