के.नारखेडे विद्यालयात वाहतूक सुरक्षा पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे


भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात सोमवार, 29 जानेवारी रोजी वाहतूक सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जागरूकता निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट सक्ती, नंबर प्लेट, ट्रिपल सीट, वाहतुकीच्या संदर्भातील विविध चिन्ह व खुणा याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

याचबरोबर या किशोरवयीन मुलांनी सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सावध राहणे कसे गरजेचे आहे हे आपल्या विविध अनुभवातून विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक नितीन किरंगे यांचे मार्गदर्शन लाभले. एस.एस.कापसे, एस.एस.बोंडे, जी.व्ही.पाटील यांनी परीश्रम घेतले. आभार एस.पी.महाजन यांनी मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !