निंभोरा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक कैलास ठाकूर रुजू
खिर्डी : निंभोर्याचे पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक ग्रामीण येथील कळवण पोलीस ठाण्याचे कैलास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.
बदलीनंतर ठाकूर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. कर्मचारी व ग्रामस्थांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. ठाकूर यांनी नाशिक सिटी तसेच नाशिक ग्रामीण कळवण पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे.








