धुळ्यात दरोड्याचा डाव उधळला : जळगाव-धुळे जिल्ह्यातील दहा चोरीचे गुन्हे उघडकीस


Robbery plot foiled in Dhule : Ten theft cases revealed in Jalgaon-Dhule district धुळे : धुळे गुन्हे शाखेने मोहाडी हद्दीत दरोड्याचा डाव उधळत विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले तर साथीदार मात्र पसार झाले. तपासादरम्यान बालकाच्या कबुली जवाबातून धुळे व जळगाव जिल्ह्यातील तब्बल दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. पसार आरोपींनी गोंडगाव, ता.भडगाव येथे मेडिकल दुकानासह सराफा दुकानात चोरी केल्याचा प्रकार तसेच मेहुणबारे, पारोळा येथील तसेच साक्री पोलिस ठाणे हद्दीतील पाच गुन्हे तर धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आणला

दरोड्याचा डाव उधळला : समोर आली गुन्ह्यांची जंत्री
गरताड बारी येथे दरोड्याच्या प्रयत्नात कार व संशयित असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळताच पथकाने धाव घेतली. एम.एच.15 बी,डी.5831 अल्टोजवळ पथक जाताच संशयित पसार झाले तर अल्पवयीन संशयित मात्र पकडण्यात यश आले. यावेळी कारमधून पिस्टल, दोन जिवंत काडतूस, मिरची पूड तसेच दरोड्याचे साहित्य व कार मिळून एक लाख 34 हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कुविख्यात गुन्हेगारांचा दोन जिल्ह्यात धूमाकूळ
अल्पवयीन बालकाने दरोड्याच्या गुन्ह्यात संशयित वरुणसिंग टाक (दाहोद, गुजराथ), मुकूंदर जुनी (नंदुरबार), आकाश मांग (नंदुरबार), वरुणसिंग टाक याचा मित्र असल्याचे सांगत आरोपींनी 31 जानेवारी रोजी कोळगाव, ता.भडगाव येथून वॅगन आर कार चोरल्याची कबुली दिली शिवाय 2 जानेवारी रोजी कोळगाव येथे मेडिकल दुकानात चोरी केल्यानंतर भऊर, ता.चाळीसगाव येथे कारचे पेट्रोल संपल्याने कार सोडून देण्यात आली व बहाळ गावातून पुन्हा अल्टो चोरण्यात आल्याची माहिती दिली.

दहा गुन्ह्यांची कबुली
आरोपींनी मेहुणबारे, पारोळा, ता.जळगाव व गोंडगाव, ता.भडगाव, धुळ्यातील चाळीसगाव रोड येथे प्रत्येकी एक तर जानेवारी महिन्यात साक्री पोलिस ठाणे हद्दीतील दिघावे, छडवेल पखरूण, किरवाडे गावात चोर्‍या केल्याची कबुली दिली.

यांनी उघडकीस आणले गुन्हे
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक् किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखा निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खोंडे, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, संदीप सरग, हेेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संतोष हिरे, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, अशोक पाटील, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, योगेश साळवे, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, नितीन मोहणे, जगदीश सूर्यवंशी, सुशील शेंडे, कमलेश सूर्यवंशी, निलेश पोतदार, राजीव गीते, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.