97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश
चाळीसगाव : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे नुकतेच झाले. या संमेलनात चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी आपली तिहेरी भूमिका निभावली. या संमेलनात त्यांनी प्रसिद्ध दर्जेदार साहित्यिक, कवी यांचे मोठे पोट्रेट रेखाटन व अक्षरलेखन हे आगळेवेगळे चित्रप्रदर्शन संमेलनाचे आकर्षण ठरले.
खान्देशी काव्य संमेलनात निमंत्रित मान्यवर कवी म्हणून त्यांची उपस्थिती होती. यामध्ये त्यांनी मराठीचा गुणगौरव करणारी अभिमान आहे मला, मी मराठी आहे, ही रचना सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
‘अधोरेखित’ या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ, रवींद्र शोभणे, प्रा.डॉ.संजीवकुमार सोनवणे, पुण्याचे मसापचे वि.दा.पिंगळे,जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, साहित्यिक गजलकार बी, एन, चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या तिहेरी यशाबद्दल त्यांचा सन्मान संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांच्या हस्ते, पुण्याचे राजनजी लाखे, संयोजक प्रसाद देशपांडे तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.