नंदुरबारनजीक ‘आस्था स्पेशल’ ट्रेनवर दगडफेक


Stone pelting on ‘Aastha Special’ train near Nandurbar नंदुरबार : सुरत येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था ट्रेनवर नंदुरबार शहराजवळ मनोविकृताने दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली. रविवारी केंद्रीय मंत्री दर्शनाबेन जरदोश यांनी सुरत ते अयोध्येसाठी आस्था ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली होती. अयोध्येकडे निघालेली ट्रेन नंदुरबारला पोहोचताच रात्री ट्रेनवर दगडफेक झाली तर यावेळी प्रवाशांनी लागलीच ट्रेनचे दरवाजे बंद केल्याने कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मनोविकृताने केली दगडफेक
समजलेल्या माहितीनुसार, रविवारी सुरतहून अयोध्येला जाण्यासाठी निघालेली आस्था ट्रेन रात्री आठ वाजता सुरत रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर नंदुरबार स्थानकानजीक रात्री 10.15 वाजेच्या सुमारास ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. यावेळी प्रवाशांनी लागलीच ट्रेनचे दरवाजे लावून घेतले मात्र काही दगड ट्रेनमध्ये पडले तर कुणीही यात जखमी झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या ट्रेनमध्ये एकूण 1340 प्रवासी होते. रेल्वेवर दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाला याची माहिती कळताच संशयितांचा शोध सुरू झाल्याने एका मनोविकृताने ही दगडफेक केल्याचे माहिती समोर आली आहे. संशयितांविरोधात नंदुरबार रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


कॉपी करू नका.