अ.भा.कोळी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक सोनवणे
Deepak Sonwane as District President of A.Bha.Koli Society भुसावळ : अखिल भारतीय कोळी समाज, नवी दिल्ली या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक नुकतीच नाशिक येथे झाली. या बैठकीत दीपक आत्माराम सोनवणे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या बैठकीला राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, व अन्य राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. दीपक सोनवणे यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एम.एल.माहोर, माजी मंत्री डॉ.दशरथजी भांडे, प्रा.प्रदीप नवसारे, अॅड.वसंत भोलांनकर, भुपेंद्र जाधव, प्रमिला चव्हाण यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देवून गौरविण्यात आले.

