मुक्ताईनगर तहसीलदारपदी गिरीश वखारे
Girish Wakhare as Muktainagar Tehsildar मुक्ताईनगर : गेल्या अनेक दिवसांपासून रीक्त असलेल्या मुक्ताईनगरला अखेर तहसीलदार मिळाले असून याबाबत अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत. मुक्ताईनगरच्या तत्कालीन तहसीलदार श्वेता संचेती यांची बदली झाल्यानंतर येथील तहसीलदारांचे पद रीक्त होते. यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या अनुषंगाने शनिवारी राज्य शासनाने मुक्ताईनगरच्या तहसीलदारपदी गिरीश वखारे यांची नियुक्ती केली आहे. ते नंदुरबार तालुक्यातील तळोदा येथे तहसीलदारपदी कार्यरत होत. राज्य शासनाने केलेल्या बदल्यांमध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील विजय बनसोडे यांची भडगाव तहसीलदार म्हणून बदली केली आहे. मुक्ताईनगर व भडगाव येथील नवनियुक्त तहसीलदार हे लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.


