चोरट्यांनी चक्क नंदुरबार शहरातून एसबीआयचे एटीएमच पळवले : बँकेला 26 लाखांचा फटका


Thieves looted SBI ATM from Nandurbar city: 26 lakh hit to the bank नंदुरबार : सुमारे 26 लाखांची रोकड शिल्लक असलेले एटीएमच मशीनच नंदुरबार शहरातून चोरट्यांनी लांबवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडला असलातरी शुक्रवारी सकाळी उजेडात आल्यानंतर पोलीस यंत्रणेने संशयिताचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी एका वाहनात टाकून एटीएम लांबवल्यानंतर ते शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर कोळदे शिवारात फेकून दिले. यावेळी संशयितांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरटे सराईत असून त्यांनी रेकी करून ही एटीएम मशीन लांबवल्याचे स्पष्ट आहे.

चक्क एटीएम मशीनच लांबवले
नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लावण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर पाच ते सहा चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधम एटीएम कक्षात प्रवेश केला. वायररोपच्या सहाय्याने एटीएम एका वाहनात टाकून संशयितानी पळ काढला. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळदे गावाजवळील एका शेतात या एटीएमला चोरट्यांनी फेकले व तत्पूर्वी गॅस कटरने मशीनचे भाग स्वतंत्र करण्यात आले व कॅश ट्रे मधील 26 लाख 23 हजारांची रोकड लांबवली.

चार पथके रवाना
संशयिताच्या शोधार्थ चार पथके तयार करण्यात आली असून ती ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. कॅमेर्‍याचा डीव्हीआर सुरक्षित असल्याने हा तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.


कॉपी करू नका.