भुसावळात अल्पवयीन युवतीचा विनयभंग : दोघांना अटक
Molestation of minor girl in Bhusawal : Two arrested भुसावळ :शहरातील घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात 1 मार्चला रात्री उशीरा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर तिसर्या संशयित अल्पवयीन असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.
झोपडीत शिरत कुटूंबाला मारहाण
घोडेपीर बाबा दर्गा रोडवर एका झोपडीत राहत असलेली 17 वर्षीय मुलगी व तिची आई 28 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता झोपडीत असतांना तीन युवक झोपडीत शिरले. त्यांनी युवतीच्या आईला माारहाण केली. यावेळी युवतीने मारहाणीचे कारण विचारले असता, त्यांना राग आल्याने त्यांनी तुझे भाऊ कुठे आहे, याची विचारणा केली. त्यांना बोलवत नााही तर तुला उचलून घेऊन जाऊ असा दम भरला. ते जीम मध्ये गेल्याचे सांगितल्यावर त्यांना फोन करायला लावला. दोन्ही भाऊ घरी आले असता, त्यांनी तिन्ही युवकांना घरात शिरण्याचे व मारहाण करण्याचे कारण विचारले असता, युवतीसह दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन युवतीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.

