भुसावळात स्पा सेंटर आड वेश्या व्यवसाय : बर्‍हाटे दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी

रेल्वे, दीपनगरसह ऑर्डनन्स फॅक्टरींचे हायप्रोफाईल ग्राहक पोलिसांच्या रडारवर


Bhusawalat spa center disguised as prostitution business : Barhate couple sent to police custody भुसावळ : स्पा सेंटर आड महेश नगरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी छापा टाकून पाच तरुणींची सुटका केली होती तर दोन ग्राहकांना ताब्यात घेत विशाल बर्‍हाटे व पल्लवी बर्‍हाटे या दाम्पत्याला अटक केली होती. दाम्पत्याला मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उच्चभू्र वसाहतीत सुरू होता व्यवसाय
भुसावळातील उच्चभू्र महेश नगराील एका बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानतर विशेष पथकाने छापेमारी करीत पाच तरुणींची सुटका केली होती तर दोन ग्राहकांना ताब्यात घेतले होते. पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर भागातील पाच तरुणींना देह विक्रीसाठी प्रोत्साहित करून त्यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी विशाल व पल्लवी बर्‍हाटे या दाम्पत्याविरोधात पीटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना मंगळवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.



आंबटशौकीन ग्राहक आता रडारवर
बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी पोलिसांची बाजू मांडली. पोलिसांनी सुटका केलेल्या पाच तरुणींनी जळगाव सुधारगृहात रवानगी करण्यात आली. यातील दोन तरुणी विवाहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पोलीस कोठडीत बर्‍हाटे दाम्पत्याच्या संपर्कात आणखी काही तरुणी आहेत का? किती दिवसांपासून हा व्यवसाय सुरू होता शिवाय यात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का? तसेच आंबटशौकीन ग्राहकांबाबतही माहिती कळणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !