नागादेवी धरण तलावाजवळील वस्तीतील बालकावर अस्वलाचा हल्ला


A bear attacked a child in a settlement near the Nagadevi dam lake यावल : सातपुड्याच्या कुशीत नागादेवी धरणावरील आदिवासी वस्तीतील सहा वर्षीय बालकावर अस्वलाने हल्ला केला. ही घटना याच वस्तीतील एका 23 वर्षीय तरुणाने पाहिली आणि त्याने अस्वलाच्या तावडीतून या बालकाला सोडवले. या बालकाच्या पाठीवर दुखापत झाली असून 23 वर्षीय तरुणाला पायावर अस्वलाने नखं मारली आहेत. जखमी अवस्थेत दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

अचानक केला हल्ला
सातपुड्याच्या कुशीतील नागादेवी आदिवासी वस्तीवरील राहुल राजू बारेला (वय सहा) हा इतर बालकांसोबत जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेला असता अचानक त्याच्यावर अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. हा प्रकार वस्तीतीलच सुनील बारेला (23) या तरुणाच्या निदर्शनास पडताच त्याने आपल्या हातातील काठीने अस्वलावर हल्ला चढवला आणि अस्वलाच्या तावडीतून राहुल बारेला याला सोडवले. या झटापटीत सुनील बारेला याच्या पायाला देखील अस्वलाने नखे मारत किरकोळ जखमी केले. दोघांना जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. तुषार सोनवणे, अधिपरीचारिका नेपाली भोळे, अमोल अडकमोल यांनी त्यांच्यावर उपचार केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !