खंडपीठाचा सा.बां.विभागाला दणका : कंत्राटदाराची बाजू ऐकून निर्णय देण्याचे आदेश


भुसावळ : प्रजिमा 58 ते कुंभारखेडा, चिनावल, वाघोदा निंभोरा रस्ता, प्रजिमा 73 किमी 8/00 वाघोदा येथे लहान पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदार उत्तम धर्मा कोळी (भुसावळ) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा सूचना क्रमांक 27 सन 2022-2023 निघाल्यानंतर निविदा सादर केली मात्र विहित मुदतीत निविदा राजकीय मुदतीत निविदा उघडून मंजूर होत नसल्याने व न्याय मिळण्यासाठी कंत्राटदाराने खंडपीठात याचिका दाखल केली.

खंडपीठात याचिकेवर सुनावणी होवून न्या.विभा कंकणवाडी व न्या.एस.जी.चपळगावकर यांनी कंत्राटदाराने मुख्य सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या निवेदनावर मुख्य अभियंता यांना एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचेही सूचित करण्यात आल्याने सा.बां.विभागाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. खंडपीठाच्या निर्णयामुळे निविदा वेळेवर उघडण्यासह वरील ठिकाणी बांधकाम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तक्रारदार उत्तम कोळी यांच्यातर्फे अ‍ॅड.हर्षल पी.रणधीर यांनी बाजू मांउली. त्यांना अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !