बोदवड तालुक्यात परप्रांतीय तरुणाचा खून : आरोपीला अटक


Murder of migrant youth in Bodwad taluka : Accused arrested बोदवड : बोदवड तालुक्यातील चलचक्र शिवारातील कोरड्या विहिरीत तरुणाचा खून करून मृतदेह फेकण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कुंवरसिंह राजाराम बारेला (35, खामला, ता.बर्‍हाणपूर) असे मयताचे नाव आहे. खूनप्रकरणी आरोपी जगदीश उर्फ सत्र्या गणा पावरा (43, रायसागर, ता.भगवानपूरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु.जुनोना, ता.बोदवड) यास अटक करण्यात आली.

खून करून मृतदेह फेकला
बोदवड तालुक्यातील चलचक्र शिवारातील शंकर जयराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो कुंवरसिंह राजाराम बारेला (35, खामला, ता.बर्‍हाणपूर) असल्याचे निष्पन्न केले. मयताचा खून करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी संशयित आरोपी जगदीश उर्फ सत्र्या गणा पावरा (43, रायसागर, ता.भगवानपूरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु.जुनोना, ता.बोदवड) यास अटक केली. त्याच्या विरोधात मयताचा भाऊ आसाराम राजाराम बारेला (32, जुनोना, ता.बोदवड) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अंकुश जाधव, शशिकांत शिंदे, दीपक पाटील, भागवत पाटील, मिलिंद जाधव आदींनी आरोपीला अटक केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !