भुसावळात चक्कर येवून पडल्याने प्रौढाचा मृत्यू


भुसावळ : पेट्रोल पंपावर पाणी पिण्यासाठी जात असताना चक्कर येवून पडल्याने 56 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. 5 मार्च रोजी ही घटना घडली. प्रकाश वासुदेव पाटील (56, धांडेवाडा खडका, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे. प्रकाश पाटील हे सदगुरू पेट्रोल पंपावर पाणी पिण्यासाठी जात असताना त्यांना अचानक चक्कर आले व त्यांचा मृत्यू ओढवला. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !