यावल तालुक्यात अवैधरित्या लाकडाची वाहतूक : एकाविरोधात गुन्हा


Illegal transportation of timber in Yaval taluka : Crime against one यावल :मोहराळा-कोरपावली रस्त्याने वाहन चालक खलील रफिक तडवी (कोरपावली) हा अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असताना वनविभागाच्या पथकाने संशयिताला पकडत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगाव यांनी दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव यांच्यकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून मोहराळत्त े कोरपावली रस्त्याने वनपथक दबा धरुन् बसले असताना एका ट्रॅक्टरमध्ये अंजन, निम इमारतीचे अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा केले.



पुढील कार्यवाही जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे अधिनस्थ स्टाफ हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !