भुसावळात गावठी दारू विक्रेत्यांविरोधात डीवायएसपींच्या पथकाची कारवाई : पाच हजारांची दारू जप्त
DySP’s team action against village liquor sellers in Bhusawal : Liquor worth five thousand seized भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल हेवन मागील दिनदयाल नगरात गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाई निर्देश दिल्यानंतर सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या दोन कारवायांमध्ये पाच हजार 350 रुपये किंमतीची 107 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
अवैधरीत्या गावठी दारू विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ
पहिल्या कारवाईत ईरफान शाह ईस्माईल शहा व रहिम शहा मोहमद्द शहा (दोन्ही रा.दिनदयाल नगर, भुसावळ) यांच्याकडून तीन हजार 750 रुपयांची 75 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी नाईक अनिल झुंजारराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


दुसर्या कारवाईत संशयित ईरफान शाह ईस्माईल शहा (रा.दिनदयाल नगर, भुसावळ) याच्याकडून एक हजार 600 रुपये किंमतीची 32 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी हवालदार संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रदीप पाटील, एएसआय शालिनी वलके, हवालदार नंदकिशोर सोनवणे, हवालदार संदीप चव्हाण, हवालदार अश्विनी जोगी, नाईक अनिल झुंजारराव आदींच्या पथकाने केली.