वाळू माफियांची मुजोरी थांबेना : यावल तहसीलमधील अवैध गौण खनिज वाहतुकीचे वाहन तिघांनी पळवले


The sand mafia’s rampage does not stop: Three people ran away the vehicle of illegal minor mineral transport in Yaval Tehsil. यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे रविवारी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन महसुलच्या गस्ती पथकाने पकडले मात्र मध्यरात्रीनंतर हे वाहन तीन जणांनी तहसील कार्यालयात येवून मुख्य गेटचे कुलूप तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेर फोडून पळवल्याचा धक्कादायक प्रमोर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलसी ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळू माफियांची मुजोरी : तहसीलमधून वाहन पळवले
किनगाव, ता.यावल परिसरात रविवार, 17 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी वसीम तडवी, शरीफ तडवी, ईश्वर कोळी, मिलिंद कुरकुरे, कोतवाल समीर तडवी आदींनी गस्तीवर असताना रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करतांना अशोक लेलँड कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन जप्त केले. या वाहनाचा पंचनामा करून किनगाव येथून यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले दरम्यान सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयातील मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचा कॅमेर्‍या पैकी एक कॅमेरा फोडून टाकत विना क्रमांकाचे वाहन पळवून नेले.



तिघांविरोधात गुन्हा दाखल
हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भूषण कोळी, स्वप्नील कोळी व विठ्ठल कोळी (सर्व रा.रिधूर, ता.जळगाव) यांच्या विरोधात भादंवि कलम 379, 341, 422 तसेच गौणखनिज कायद्यातील कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !