दीपनगरातील संशयित दोन वर्षांसाठी धुळे व जळगाव जिल्ह्यातून हद्दपार


Deepnagar suspect deported from Dhule and Jalgaon districts for two years भुसावळ  : भुसावळ तालुक्यातील दीपनगर-निंभोरा येथील संशयिताला गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जळगाव व धुळे जिल्ह्यातून भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी हद्दपार केले आहे. प्रदीप सुरेश कोल्हे (29, दीपनगर-निंभोरा, ता.भुसावळ) असे हद्दपार संशयिताचे नाव आहे.

प्रांताधिकार्‍यांचे आदेश
सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत भुसावळ तालुका पोलिसांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले होते. प्रस्तावाची पडताळणी होवून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. कोल्हे यांच्याविरोधातील विविध गुन्हे पाहता त्यांना दोन वर्षांसाठी धुळे व जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकार्‍यांनी सोमवार, 18 मार्च रोजी आदेश काढले आहेत.


कॉपी करू नका.